Saturday, May 9, 2015

विमा पॉलिसीचा प्रिमियम कमी कसा करता येईल, याचे काही उपाय आम्ही इथे देत आहोत.विमा पॉलिसीचा प्रिमियम कमी कसा करता येईल, याचे काही उपाय आम्ही इथे देत आहोत.
तरुण वयातच घ्यावी पॉलिसी
विम्याची पॉलिसी खरेदी करण्यास वेळ लागू देऊ नये. जस जसे तुमचे वय वाढेल. त्याप्रमाणे विम्याचा हप्तादेखील वाढत जातो. अनेक तरुण आर्थिक बोजामुळे विम्याला गंभीरपणे घेत नाहीत. जसे जसे वय वाढू लागते, तस तसे कळते की विमा खूप आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षांनंतर विमा पॉलिसी घेतली आणि तुम्हाला कोणता आजार असेल, तर तुमच्या प्रिमियमची रक्कम वाढू शकते. त्यामुळे तरुण वयात लवकरात लवकर पॉलिसी घेणे कधीही फायदेशीर ठरते.
ऑनलाईन खरेदी उपयुक्त
काही विमा कंपन्यांच्या ऑनलाईन पॉलिसी स्वस्त असतात. संपूर्णपणे माहिती घेऊन ऑनलाईन पॉलिसी खरेदी करणे कधीही फायदेशीर ठरते. तुम्ही एजंटकडून पॉलिसी घेतली तर त्याच्या प्रिमियममधील ठरावीक रक्कम एजंटला द्यावी लागते. त्यामुळे एजंटकडून पॉलिसी घेणे शक्य असल्यास टाळावे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही विमा पॉलिसी खरेदी केली तर कोणत्याही पेपरवर्कचा खर्च येत नाही आणि त्याचबरोबर एजंटला द्याव्या लागणाऱया रकमेतही बचत होते. त्यामुळेच अनेक विमा कंपन्यांनी आपल्या ऑनलाईन पॉलिसीच्या किंमती कमी ठेवल्या आहेत.
तंदुरुस्तीकडे द्यावे काटेकोरपणे लक्ष
शारीरिक तंदुरुस्तीकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. जसंजसे वय वाढू लागते, तसंतसे कोणताही मनुष्य कमजोर होऊ लागतो. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. तुम्हाला जर कोणता आजार असेल, तर विमा कंपन्या तुमच्याकडून अतिरिक्त प्रिमियम वसुली करतात.
गरज असेल तरच घ्यावेत अन्य रायडर
तुम्ही जर स्वतंत्रपणे ऍक्सिडेंट किंवा क्रिटकल इलनेसचा विमा उतरविला असेल, तर जीवनविम्यामध्ये या संदर्भातील रायडर निवडू नका. या सुविधा कोणालाही फ्रीमध्ये मिळत नाहीत. त्याची वेगळी किंमत चुकवावी लागते. त्यामुळे गरज असेल तरच क्रिटिकल इलनेससंदर्भातील रायडरची निवड करावी.
वर्षाला भरावा प्रिमियम
विमा पॉलिसीचा प्रिमियम वर्षाला देण्याचा पर्याय निवडावा. जर तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक प्रिमियम देण्याचा पर्याय निवडला, तर तुम्हाला जादा पैसे द्यावे लागतात. वर्षाला प्रिमियम भरण्याचा पर्याय निवडला तर विविध अधिभारातून तुमची सुटका होते. त्यामुळे आपोआपच तुमचा प्रिमियम कमी होतो.
पॉलिसीची मुदत
जर तुम्ही दहा वर्षांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला जास्त प्रिमियम भरावा लागेल. पण जर तुम्ही २० वर्षांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला कमी प्रिमियम भरावा लागेल. त्यामुळे पॉलिसीचा कालावधी शक्य तितका वाढविण्यावर जास्त भर द्यावा.

No comments:

Post a Comment