Saturday, May 9, 2015

ईपीएफओतील ५ टक्के रकमेची होणार शेअर बाजारात गुंतवणूक


सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (ईपीएफओ) पीएफ कोशातील ५ टक्के निधीला एक्स्चेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अर्थातच चालू आर्थिक वर्षात बाजारात पाच हजार कोटी रुपये येणाची शक्यता असून, श्रम मंत्रालयाने यासंबंधीची ईपीएफओतील गुंतवणुकीसाठी एक नव्या पद्धतीची अधिसूचना जारी केली आहे. श्रम मंत्रालयाचे सचिव शंकर अग्रवाल यांनी ही माहिती नुकतीच प्रसारमाध्यमांना दिली आहे.
अग्रवाल यांनी पुढे अशीही माहिती दिली की, आम्ही ईटीएफमध्ये गुंतवणुकीची सुरुवात एक टक्क्यापासून करू आणि या अार्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत ती गुंतवणूक ५ टक्क्यांपर्यंत वाढविली जाईल. अर्थ मंत्रालयाने याबाबतीत असा सल्ला दिला आहे की, आम्ही आपल्या निधीतील ५ ते १५ टक्के निधीची गुंतवणूक शेअर बाजारात करावी. आम्हाला याची सुरुवात फक्त इटीएफ च्या माध्यमातून करावयाची आहे. यानंतर आम्ही ठरवू की, पीएसयू ईटीएफमध्ये कीती वाटा लावायचा आहे. जर हे श्रमिकांच्या हिताचे असेल तरच असा निर्णय घेतला जाईल. २०१४ -१५ मध्ये ईपीएफओ ला जवळजवळ ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी (डिपॉझीट) मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ईपीएफओ च्या सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मासिक वेतन मर्यादेला ६,५०० वरुन वाढवून १५,००० रुपये केले गेले आहे. यामुळे अार्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये एक लाख कोटींच्या ठेवी मिळण्याचे अंदाज आहेत.
Saurce- Divymarathi 

No comments:

Post a Comment